वि. वा. शिरवाडकरांची एक कथा "नास्तिक" वाचण्यात आली. कथा जरी काल्पनिक असली तरी विचार करायला लावणारी होती. गेल्या काही वर्षातल्या अनेक घटनांची मालीका डोळ्यासमोर उभी राहीली. माझ्या अस्तिकते बद्द्ल अनेक प्रश्न मनात उमटले. कालांतराने सगळे निवळले. माझी मला उत्तरे मिळाली. या शब्दांचे अर्थ निदान माझ्यापुरते तपासून त्यांची परत 'प्रतिष्ठापना' करण्यात आली. तरी तो धागा कुठेतरी तसाच राहीला असावा आणि नंतर वाचायला घेतलेल्या 'गुलज़ार' मधे तो नकळत मिसळला असावा. ही कविता कशी सुचली याला हेच उत्तर मी देऊ शकतो.
2 comments:
खूपच छान कविता. बहुतेक देव, धर्म हे भीती दाखल असतात. लोक ज्याला श्रद्धा म्हणतात ती केवळ त्यांची भीती असते.
एक गोष्ट आठवली...येथे कदाचीत समर्पक नाही पण तरीही लिहिते. मी गल्फमधे असताना मला माझ्या एका पाकिस्तानी मैत्रिणीने विचारले, "नास्तिकाला मेल्यावर जर देवासमोर उभे रहावे लागले तर त्याची आणि देवाची प्रतिक्रिया काय असेल?" यावर मी तिला सांगितल, "फारशी काही नाही, तो म्हणेल बा देवा मला नव्हत माहित की तू आहेस ज्या काही चुका घडल्या त्या मी करतो ते बरोबर, मीच श्रेष्ठ या कल्पनेतून." पण आस्तिक जर देवा समोर उभा राहिला तर देव त्याला विचारेल,"अरे प्राण्या जर तुला माहित होतं की मी आहे आणि मृत्यु नंतर माझ्या समोर उभे रहायचे आहे तरिही तू इतकी पापं का केलीस? तुझा गुन्हा नास्तिकापेक्षा कित्येक पटींनी जास्त आहे."
धन्यवाद
बरोबर आहे. पण ही भीती देखिल आवश्यक आहे. जिथे न्यायव्यवस्था पोचू शकत नाही तिथे कमीत कमी ही भीती उपयोगी ठरते. कोणी पहात नाही म्हणल्यावर एखादी चूक करायला कोणी कचरत नाही. साधच उदाहरण घ्यायचं तर मामा नसेल तेव्हाही सिग्नल पाळणारे थोडेच. एकंदरीत काय तर समाजव्यवस्था निरोगी ठेवायला पूर्वीच्या लोकानीं केलेली ही योजना असावी. अध्यात्मिक आणि मानसिक पातळीवरून न बघता सामाजीक दृष्तीकोनातून बघण्याचा एक प्रयत्न.
Post a Comment