Friday, March 24, 2006

स्पर्श चांदण्याचा


एका मैत्रीणीचा ब्लॉग वाचत होतो मनाला एकदम भावला आणि वाचता वाचता या छायाचित्राची आठवण झाली.
-------
तेवढ्यात कुणाचंसं ओळखीचं हसू दिसलं. बडिशेपेच्या बशीत शेवटी राहिलेल्या कंटाळवाण्या दाण्यांमध्ये अचानक खडीसाखरेचा इवला तुकडा चमकून जावा तस्सं वाटलं. एका स्मितहास्यात काय जादू असते सगळा माहौल बदलवून टाकण्याची! 'मूड' अगदीच विस्कटलेला नसेल, तर समोरच्याचं हसणं आपल्याही चेहऱ्यात उमटतं पाहतापाहता. त्यातसुद्धा, बघितलेलं हसणं प्रीती झिंटासारखं खळीदार असेल तर संदीप खरेच्या शब्दांत " असे हालते आत हळुवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा!"
------------ इति गायत्री (http://bolaacheekadhee.blogspot.com/)

2 comments:

Gayatri said...

:) माझ्या जालनिशीवर उत्तर लिहिलंय.

तुझ्या लेखांमधल्या दोन मात्रा नीट का दिसत नाही आहेत? 'baraha direct' च वापरतोयस ना? 'मेत्रीण''ब्लौग' असे दिसतायत शब्द (की तू maitreeN ऐवजी metreeN , bl~og ऐवजी blaug लिहितोयस? ;) )

prasad bokil said...

माझा ब्लॉग लिहायचा चुकत होता.
आणि दोन मात्रांना मी 'E' वापरत होतो. धन्यवाद!