Monday, November 03, 2008

पुन्हा तेच

सूर्याचे ते नीत्याचे
येणे जाणे
रंगीत गाणे
अन चंद्राचे महिनाभर
लहान मोठे
खरे खोटे
वैषाखाची दर वर्षी
लाही लाही
काही बाही
अन पावसाचा मागोमाग
कस्ला जोर
नस्ता घोर
फलाटाच्या जीन्याखाली
खाणे पिणे
मुके घेणे
अन लोकलच्या डब्यामधे
वाजे टाळ
शीवी गाळ
इराण्याच्या पावावर
कमी भाव
मारी ताव
अन बंदराची खारी बोंबील
ओली सुकी
सारी भुकी

तोच दिवस तीच वेळ
तीच मिसळ तीच भेळ
तोच घाम तीच व्हाण
तेच काम तीच घाण
जुनेच पाप जुनाच गुन्हा
तेच तेच पुन्हा पुन्हा
पुन्हा पुन्हा तेच तेच
तेच तेच पुन्हा पुन्हा

9 comments:

आशा जोगळेकर said...

वा छान जमलीय कविता.

Shubhangee said...

विंदा करंदीकराच्या कवितेची आठवण झाली.(कवितेचे नाव विसरले, बहुदा ’सारे काही तेच तेच’)
शुभा मावशी

Kaustubh said...

Ph.D. Blues? :)

Kavita Aavadali.

चिन्मय धारूरकर/Chinmay Dharurkar said...

पाडगांवकर, विंदा आणि बापट ठुसून भरलेत राव अगदी!मानलंच पाहिजे! म्हणजे या स्तुतीला काही अर्थ आणि औचित्यच ठेवलं नाहीयेस.नुसतं ठळक जमलय अरे तुला!

Chinmay Dharurkar

Ashish Kulkarni said...

प्रसाद, ही कविता झाल्याबद्दल अभिनन्दन..:)
आवडली तुझी कविता .... साधी सुधी नाही... 'पुन्हा पुन्हा' .. 'खुप खुप' आवडली ... नक्कीच !

Makarand MK said...

really a nice poem!!
malahi VINDANCHI athavan zali.

Tulip said...

अरे ते तु शब्दचित्र का काय लिहायचास ’सवंगडी-१/२’ असं ते का कंटीन्यू केलं नाहीस नंतर?झकासच होतं.

मंदार said...

jhakaas....
khup divsanni mast kavita...
jara parat lihite vha !1

Prachi Malandkar said...

V Nice poem Prasad :)
U write really well.