"फोटोग्राम" म्हणजे camera शिवाय चे छायाचित्र. छायाचित्रासठी वापरण्यात येणारा, प्रकाशाला संवेदनशील असा कागद जेव्हा प्रकाशात येतो तेव्हा काही क्षणांच्या अवधीत तो रापतो. अशावेळी कोणत्याही अपारदर्शक वस्तूमुळे जर प्रकाश आडवला गेला म्हणजेच त्याची सावली या कागदावर पडली तर त्या ठिकाणची त्याची धवल कांती तशीच राहते. नंतर त्या कागदावर प्रक्रिया करून त्याची प्रकाश संवेदना नष्ट केली जाते. छायाप्रकाशामुळे जे चित्र कागदावर उमटलेले असते त्याचे अस्तित्व त्यामुळे टिकून राहते.
याला छायाचित्र म्हणावे की प्रकाशचित्र?
तर बोरकरांच्या एका कवितेने मनात उमटलेले दृष्य जे खरे तर बहुआयामी आहे
आणि ते मूर्त करायचे तर मला आणि माध्यमाला दोघांनाही मर्यादा आहेतच.
परंतु या माध्यमातून माझ्याकडून जसे साकारले गेले तसे........
******
या नदीच्या पार वेड्या यौवनाचे झाड आहे
अमृताचा चंद्र त्याच्या पालवीच्या आड आहे
मेदिनीच्या रोमरोमी रेशमी उन्मेश आहे
केशरी त्याला उषेचा कस्तुरी आशीष आहे
मख्मली प्रत्येक पुष्पी अंबराचे बिंब आहे
चुंबुनी त्याला हवेचा जीव ओला चिंब आहे
धुंद तेथे रे परेच्या पारव्यांचा वृंद आहे
नाचर्या आनंदमोरा घुंगुरांचा छंद आहे
तेथल्या पाण्यात वीणा रागिणीची ओढ आहे
सावल्यांना कांचनाच्या नागिणीची मोड आहे
तेथ जाया वेगवेडी पारजाची वाट आहे
शांतवाया ताप अंती गोकुळीचा माठ आहे
---- कवी बा भ बोरकर
6 comments:
kya baat hai - prakaashchitra aaNi borkaraanchi kavita donhichee! :)
याला तरी ’प्रसादचित्र’ म्हणूयात! किती उत्कृष्ट आहे हे!
चंद्राआडच्या ओंबीला ती कांचनाच्या नागिणीची मोड कशी काय आली? फार फार सुरेख दिसते आहे.
छान .. धन्यवाद ..
कृपया " पारजाची वाट" ह्या शब्दाचा नेमका अर्थ कुणी सांगू शकेल काय ...
कवितेची ओळ अशी आहे ...
" तेथ जाया वेगवेडी पारजाची वाट आहे "
परजाची म्हणजे पारा
पारिजातकाच्या फुलांचा सडा पडलेली वाट
Post a Comment