याला छायाचित्र म्हणावे की प्रकाशचित्र?
तर बोरकरांच्या एका कवितेने मनात उमटलेले दृष्य जे खरे तर बहुआयामी आहे
आणि ते मूर्त करायचे तर मला आणि माध्यमाला दोघांनाही मर्यादा आहेतच.
परंतु या माध्यमातून माझ्याकडून जसे साकारले गेले तसे........
******

या नदीच्या पार वेड्या यौवनाचे झाड आहे
अमृताचा चंद्र त्याच्या पालवीच्या आड आहे
मेदिनीच्या रोमरोमी रेशमी उन्मेश आहे
केशरी त्याला उषेचा कस्तुरी आशीष आहे
मख्मली प्रत्येक पुष्पी अंबराचे बिंब आहे
चुंबुनी त्याला हवेचा जीव ओला चिंब आहे
धुंद तेथे रे परेच्या पारव्यांचा वृंद आहे
नाचर्या आनंदमोरा घुंगुरांचा छंद आहे
तेथल्या पाण्यात वीणा रागिणीची ओढ आहे
सावल्यांना कांचनाच्या नागिणीची मोड आहे
तेथ जाया वेगवेडी पारजाची वाट आहे
शांतवाया ताप अंती गोकुळीचा माठ आहे
---- कवी बा भ बोरकर
12 comments:
kya baat hai - prakaashchitra aaNi borkaraanchi kavita donhichee! :)
याला तरी ’प्रसादचित्र’ म्हणूयात! किती उत्कृष्ट आहे हे!
चंद्राआडच्या ओंबीला ती कांचनाच्या नागिणीची मोड कशी काय आली? फार फार सुरेख दिसते आहे.
छान .. धन्यवाद ..
कृपया " पारजाची वाट" ह्या शब्दाचा नेमका अर्थ कुणी सांगू शकेल काय ...
कवितेची ओळ अशी आहे ...
" तेथ जाया वेगवेडी पारजाची वाट आहे "
परजाची म्हणजे पारा
पारिजातकाच्या फुलांचा सडा पडलेली वाट
Medini arth kay
मेदिनी अर्थ काय
मेदिनी म्हणजेच पृथ्वी
पाऱ्याची वाट म्हणजे "पारजाची वाट". पारा बंधनातून सुटला की अत्यंत वेगवान होऊन, बेफाम पणे पसरत जातो, त्याप्रमाणे शांत, दिव्य स्पर्शाच्या मुक्कामाला जाणारी वाट आश्याच बेभानपणे उसळीत जाते
Sundar..
https://youtu.be/tDZ5cA3OWmw?si=6pXHr7s81tTWn7Ud
Post a Comment