Monday, September 14, 2009

रेघांमागून

केस पिंजारलेले ते दोघं चौघं (माड)
घाईनं आंघोळी उरकून घेतात
कुंपणाशी राखणीला बसलेली म्हातारी (भिंत)
हिरवं लुसलुशीत इरलं अंगभर ओढून घेते.
फाटकाशी पाठीत कुबड काढून ओणावलेला तो (प्राजक्त)
उभ्याउभ्याच आळस दिल्यासारखा करतो
ओल्या रस्त्याच्या कडेला फतकल मारून बसलेली फुलवाली (कोरांटी)
आपली मळकट छत्री झटकते
...
पागोळ्य़ांतून मारलेल्या उभ्या रेघांमागून हे सगळं बघत
मी दारात उभा असतो
आणि
माझं मन एखाद्या वांड मुलासारखं
प्रत्येक थेंबात उड्या मारून पाणी उडवत राहतं
...
जेव्हा श्रावण माझ्या घरी पाहुणा म्हणून येतो.

9 comments:

Rahul Revale said...

aavadalee kavita!

Shubhangee said...

कंसातल्या टीपा(किंवा नावे काही म्हण) माझ्यासाठी ना? नाहीतर पुन्हा आम्ही तुझ्यावर गूढ किंवा अनाकलनीय असे आरोप करु. मस्तच आहे गद्यकाव्य.
शुभा मावशी

Saee said...

Very pretty.
All your current posts have been rain-soaked. =)
I miss it. The rain in Australia is just like the men (and women) here. If it ever turns into a human it would want to have a beef steak and a beer right away. :(
So I miss the Shravan in Pune.
But I can read it here. =)
Thanks

Shashank Kanade said...

mastach re artprasd!
puNyaachyaa aaThavaNInnI man veDa zaalay re...

समीक्षक said...

ब्लॉगच्या नावाप्रमाणेच प्रासादिक लिहिले आहेत. शोधूनही नाव ठेवण्यासारखे काही सापडले नाही. अभिनंदन आणि पुढील लिखाणासाठी शुभेच्छा.

Nandan said...

क्लास!

Abhi said...

wah!!!

Samved said...

बाबा रे, एक्दा भेटला पाहीजे तुला

prasad bokil said...

thank you very much.

Samved, my mail id is prasad.bokil@gmail.com
please send me your mail id so we can communicate.