Sunday, February 26, 2006

दुवा


तो एकटाच बरसत राहीला एकांड्या शिलेदारा सारखा

सारी धरती त्याला गंधीत करयची होती

त्याचं स्वप्न होतं तिला हिरवेपणी बघण्याचं

तो ऊर फुटोस्तोवर गडगडत राहीला

अगदी शेवटच्या थेंबापर्यंत

काळ्या फत्थरावरचा थेंब अन थेंब कुणी पुसला जणु

त्या काळतोंड्याच्या चेहयावर जीवनाची रेषाही हालली नाही

तो निरशेने इतका गुदमरला इतका गुदमरला

की अखेरीस फुटला,

आकाशात विरून गेला

चार दगडंच्या फटीतून डोकावणारा हिरवा हात

दुवा देत राहीला

नुकत्याच अनुभवलेल्या आज्ञात विधात्यास

त्या दिवंगत जीवनदात्याला

तेवढीच एक श्रद्धांजली !

Friday, February 24, 2006

मायबोली



माझी मायबोली आज आली माहेराला

नेसलीसे भागवत नाथाची पैठणी
आंगी चोळी गाथा शोभे तुकयाची नामी
ज्ञानेशाची ज्ञानेश्वरी मळवट भाळा

माझी मायबोली आज आली माहेराला
माझी मायबोली आज आली माहेराला

- सोपानदेव चौधरी