Friday, April 30, 2010

मर्ढेकरांची कविता

मर्ढेकरांच्या काही निवडक कवितांचे पुस्तक बनवण्याचा योग आला. त्यातली काही पाने (एकावेळी एक) इथे प्रदर्शित करण्याचा मानस आहे. या कविता वेगळ्या प्रकारे दृष्य माध्यमातून सादर करण्याचा हा एक प्रयत्न आहे. मर्ढेकरांनी त्यांच्या कवितांचे अर्थ कधी उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केलेला नाही. ज्याला जो समजेल तो त्याचा अर्थ. ज्याला अर्थ नाही समजला त्याच्या साठी ती कविता मी लिहीलेली नाही अशी काहीशी त्यांची भूमिका कायमच होती. त्यामुळे एक विशिष्ठ अर्थ दाखविण्याचा मुळीच खटाटोप इथे केलेला नाही. फक्त कवितेच्या मूळ गाभ्याला धक्का लागणार नाही इतकी काळजी घेतलेली आहे. ही पाने छापील पुस्तकासाठी असल्याने संगणकीय पटलासाठी खरेतर तितकीशी अनुकूल नाहीत याची नोंद घ्यावी.

मर्ढेकरांच्या कवितेतला प्रामाणिकपणा, खरेपणा हेच त्यांचे सौंदर्य आहे. उगचच देखण्या शब्दांचा वर्ख चढवून सत्यपरीस्थितीला बेगडी गुळगुळीतपणा देण्याचा (त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर- ब्रासबॅंडकी) त्यांना तिटकारा असावा. कवितेच्या अर्थाचा प्रवाह आणि त्याची संरचना याचा वेधक प्रयोग या कवितांतून केलेला दिसतो. शब्द रचनेनुसार आपापली जागा घेतात पण ते वाचत असताना त्यांतून अभिप्रेत असलेला अर्थ त्याची पुनर्मांडणी करत असतो. कधी कधी त्यातून एकाच वेळी एकापेक्षा जास्त अर्थ निर्माण होतात आणि कविता अजूनच खुमासदार होते.

इथे जी दृष्य मांडणी केलेली आहे ती या अनेकार्थाची शक्यता अबाधीत ठेऊन केलेली आहे. पण तरीही मर्ढेकरांच्या कवितेतलं शहरी जीवन- इमारती, ते रस्ते, ती गर्दी याच्याशी नातं जोदणारी मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेतरी परत परत व्यक्त होणारा एक असहायपणा, बंदीस्त असल्याची जाणीव आणि त्यातून निर्माण होणारा क्षोभ, उपहास, शरणागती हे सारे कदाचीत साकार व्हावेत अशी कल्पना केली होती. ती कितपत यशस्वी झाली आहे ते ज्याने त्याने ठरवावे.





10 comments:

Nandan said...

Uttam upakram, Prasad. Ya kavitechi maanDaNee agadee kalpak aahe. Pudheel pananchi vaaT pahto.

बिपिन said...

कल्पना सुरेख आहे. ती किती विस्त्रुतीनं वापरली आहेस (मला exploit साठी योग्य शब्द सापडत नाही आहे) हे पहायला नक्की आवडेल.

kshipra said...

surekh

a Sane man said...

मस्त. विशेषत: ‘एकेक पान गळावया’ची मांडणी अतिशय कल्पक व समर्पक वाटली. तशीच दुसर्‍या व चौथ्या कडव्यांची मांडणी मूळ कवितेत असलेल्या मांडणीला जराही धक्का न लावता उलट तिला अधिक खुलवणारी वाटली. उपक्रम स्तुत्य आहे, अजून वाचा/पाहायला आवडेल.

Gayatri said...

:) surekh! I like the 'stamped' blog-heading too.
@ Bipin: 'vistaar' would be easier. or kitapat dhaanDoLaa/ maagovaa / paaThapuraavaa.

Shubhangee said...

सुंदर मांडणी.उपक्रमहि आवडला.

शुभा मावशी

prasad bokil said...

thanks a lot.

Saee said...

khoop sundar!
Looking forward to the rest. :)

Shashank Kanade said...

तुझ्या सर्जनशीलतेची दाद द्यावी तितकी थोडी आहे, आर्टप्रास्डी!
आणि गायत्री म्हटली त्याप्रमाणे ष्टांपून केलेलं नाव आवडलं.

Mandar Gadre said...

^:)^